मैत्रीपेक्षा युतीधर्म महत्त्वाचा : चंद्रकांत पाटील 

मैत्रीपेक्षा युतीधर्म महत्त्वाचा : चंद्रकांत पाटील 
कोल्हापूरः माझी पत्नी जरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असेल तर तिच्या प्रचाराला मी जाणार नाही. आम्ही सकाळी चहा एकत्र घेऊ पण शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी मी जाईन,कारण युतीचा धर्म अगोदर, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या धनंजय महाडिक यांच्याबाबतीत उपस्थित करण्यात येत असलेल्या शंकाना उत्तर दिले.
चंद्रकांत पाटील आणि धनंजय महाडिक यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. पाटील म्हणाले की,धनंजय महाडिक दोस्त आहेत आणि दोस्तीखातर मी महाडिक यांना शिवसेना उमेदवार होण्यास सांगितले होते.आम्ही संजय मंडलिक यांना समजावतो.भाजप शिवसेनेचे सरकार आहे. महाडिक यांना आम्ही शिवसेना उमेदवार व्हा,असे म्हणालो होतो.तुम्ही शिवसेना उमेदवार असता तर मी तुमचा प्रचार अधिक जोमाने केला असता.पण आता संजय मंडलिक शिवसेना उमेदवार आहेत आणि मैत्री वगैरेपेक्षा युतीधर्म महत्त्वाचा आहे,असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी नेते धनंजय महाडिक यांची मैत्री कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे.त्यामुळे पाटील आपल्या मित्राला मदत करतील,अशा शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात होत्या. त्यांना पाटील यांनी उत्तर दिले आहे.
Previous articleआंबेडकरांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पत्राला काय उत्तर दिले
Next articleसर्वसामान्य मुंबईकरांना न्याय देणारी मुंबई बँकेची स्वयं पुनर्विकास योजना