नगरचे कार्यकर्ते स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत

नगरचे कार्यकर्ते स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत
मुंबई ‌नगरी टीम

अहमदनगरःनगरचे कार्यकर्ते स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत, या शब्दात आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला. पवार म्हणाले की,नगरमधील निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. ज्यावेळी अशी स्थिती निर्माण होते, त्यावेळी सर्वसामान्यांची शक्ती ही धनसंपत्तीवर मात करते, हा इतिहास आहे. यावर्षीही १९९१ची पुनरावृत्ती करायची आहे. कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.यावरून सुजय विखे प्रकरणाभोवती राज्यातील निवडणूक फिरणार असल्याचे संकेत मिळत आहे.

नगरमध्ये पवार यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले की,९१ मध्ये यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली. त्यावेळी सहकारातील धनसंपत्तीने (बाळासाहेब विखे) आमच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. परंतु सामान्यांनी आम्हाला साथ दिली.अनेकांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली.उमेदवार आयात करण्याबाबतही प्रस्ताव आले होते. मात्र आपल्याकडे चांगले कार्यकर्ते असताना इतरांना संधी कशासाठी द्यायची, असा निर्णय झाला. नगर, श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात आपले आमदार आहेत. काॅंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मतेही चांगली मिळतात. सर्व सहा मतदारसंघात तीच स्थिती आहे.बाहेरील उमेदवार आयात करायचा नाही, यावर आम्ही ठाम होतो. त्यामुळे आपल्याच कार्यकर्त्याला संधी मिळेल, यात शंका नाही. याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच जाहीर करतील,असे पवार म्हणाले.

पवार आणि विखे घराण्यातील वैर प्रसिद्ध आहे. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हे वैर आणखी तीव्र होणार आहे, हेही स्पष्ट झाले आहे.

 

Previous articleचार वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या
Next articleदुसऱ्यांची मुले धुणीभांडी करण्यासाठी वापरत नाही