पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी

पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने काल १२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज  ५ उमेदवारांची यादी  जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे जिरंजीव पार्थ पवार यांना मावळ मघून उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी आज दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये दिंडोरीमधून धनराज महाले, नाशिकमधून समीर भुजबळ, सर्वांचे लक्ष लागलेल्या शिरुर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे, मावळ- पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.बीडमधून बजरंग सोनवणे यांच्या नावांची घोषणा केली आहे.लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक असून, त्यासंदर्भात कॉंग्रेस सोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जातील असे पाटील यांनी सांगितले.  शरद पवार  यांनी माढा मधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून या ठिकाणच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल असे सांगतानाच एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल असेही  पाटील म्हणाले.

 

Previous articleयंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांच्या हाती “विजयाचा दोर”
Next articleमहापौर व आयुक्तांची हकालपट्टी करा : खा. चव्हाण