पार्थ पवार यांच्यासाठी सख्खा भाऊ मैदानात

पार्थ पवार यांच्यासाठी सख्खा भाऊ मैदानात
मुंबई ‌नगरी टीम

पिंपरी चिंचवडः मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतर पवार कुटुंबीय मावळ मतदारसंघातच फिरताना दिसत आहे.

आजोबा, वडील अजित पवार, आई सुनेत्रा पवार आणि आणि चुलत भाऊ रोहित हे मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. पण सोशल मीडियात गुंतलेल्या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी आता सख्खा भाऊ ‘जय’हाही प्रचाराची खिंड लढवणार आहे.पार्थ यांना विजय मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावरील प्रचाराची जबाबदारी जय पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
आजोबा शरद पवार यांनी पार्थच्या प्रचाराचा नारळ फोडला.वडील अजित पवारांकडून बैठकांचे सत्रच सुरु आहे. आई सुनेत्रा पवार महिलांना एकत्र करून छोटेखानी सभा-बैठका पार पाडत आहेत. गेल्या दोन दिवसापासून रोहित पवारही काकांच्या सूचनेनंतर प्रचारात सक्रिय झाले आहेत.जाहीर सभा, बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतील. पण जी मंडळी खासकरुन तरुणवर्ग जो सभा आणि बैठकांपासून दूर राहून सोशल मीडियात गुंतलेला आहे, त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आता जय अजित पवार सक्रीय होत आहेत.सध्या ते सोशल मीडियावरील प्रचाराची रणनीती आखण्यात मग्न आहेत.
पार्थ पवार यांच्या रुपाने पवार घराण्याची तिसरी पिढी राजकारणात येत आहे. शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीसाठी माढ्यातून माघार घेतल्याचे सांगितले.

Previous articleमी चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना घाबरत नाही
Next articleशिवाजी पार्कच्या बाभळीला “बारामतीची बोरे”