काँग्रेस शिवसेना आणि  मित्र पक्षांचा सुजय विखे यांना पाठिंबा

काँग्रेस शिवसेना आणि  मित्र पक्षांचा सुजय विखे यांना पाठिंबा

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : नगरमध्ये भाजप उमेदवार सुजय विखे यांना महाआघाडीतील पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे.नगर तालुक्यातील महाआघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्याने केवळ राष्ट्रवादीच त्यांच्या विरोधात आहे.राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. नगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.नगर तालुका काँग्रेस, शिवसेना महाआघाडीने आज भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये शिवसेनेसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे काम करण्याचा निर्धार केला आहे.

नगर जिल्हा परिषद निवडणुकीत सुजय विखे, त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे आणि राधाकृष्ण विखे यांनी नगर तालुक्यामध्ये शिवसेना-काँग्रेस आघाडीला मदत केली होती. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस-सेने महाआघाडी सुजय विखे यांना मदत करणार असल्याचे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हाराळ यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी उमेदवार संग्राम जगताप यांना या बिघाडीचा मोठा फटका बसू शकतो.विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपल्या मुलासाठी नगरची जागा मागितली होती.मात्र शरद पवार यांनी  सुजय विखे यांचे महाआघाडीत योगदान काय? असा सवाल करत जागा. सोडण्यास नकार दिला.शेवटपर्यंत जागेचा. तिढा न सुटल्याने अखेर सुजय विखे यांना भाजपमध्ये जाऊन उमेदवारी मिळवावी लागली.

 

 

Previous article…… तर ईशान्य मुंबईची जागा आरपीआयला द्या
Next article१० मतदारसंघात १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात