महायुतीच्या कार्यकर्त्यांचा राजेंद्र गावीतांना उत्सफुर्त प्रतिसाद

महायुतीच्या कार्यकर्त्यांचा राजेंद्र गावीतांना उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई नगरी टीम

 पालघर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पालघर दौ-यानंतर शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी घटक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भेट व संवाद साधल्यामुळे भाजप व ऊतर घटक पक्षांचे कार्यकर्ते यांच्या मधिल नाराजी दूर होत असून, गावीतांच्या स्थानिक कार्यकर्ता व पदाधिकारी भेट व संवाद कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

गावीतांना मिळत असलेला मोठा प्रतिसाद व कार्यकर्त्यांची मन मिळवणी करण्यात मिळत असलेले यश पाहून विरोधक जाणिवपूर्वक काही भागात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गावीतांबाबत नाराजी असल्याची अफवा पसरवली जात असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले. सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलत असल्याबाबाची टीका करणारे सत्तेत असताना केलेल्या विकासकामांची माहिती मात्र जाणिवपूर्व देत नाहीत असेही या पदाधिका-याने सांगितले. गावितांचा शिवसेना प्रवेश हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने आणि मोदींना विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील सक्षम व अनुभवी नेतृत्व गावीतांच्या रूपाने दिल्लीला पाठविण्यासाठी झालेला आहे असेही या पदाधिका-याने स्पष्ट केले.विरोधक पसरवत असलेल्या अफवांवर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी विश्वास न ठेवता महायुतीच्या राजेंद्र गावीतांना विकासासाठी पुन्हा निवडून द्यावे असे आवाहनही केले.

 

Previous articleकाँग्रेसची नोटांची बंडले सापडल्याने चौकीदाराला शिव्या
Next articleबीडच्या शेतक-यांचा रोष मतपेटीतून व्यक्त होणार