जिप निवडणुक : भाजपाला नागपूरात धक्का तर इतर ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबाला

जिप निवडणुक : भाजपाला नागपूरात धक्का तर इतर ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबाला

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी काल निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून,माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूरात जबरदस्त धक्का बसला आहे.नागपूर मध्ये ४१ जागा जिंकून महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपाला धोबीपछाड दिली आहे. मात्र धुळ्यात निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.पालघर मध्येही भाजपाला महाराष्ट्र विकास आघाडीने धक्का दिला आहे.

राज्यातील पालघर,धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्हा परिषदांसाठीचे मतदान काल पार पडल्यानंतर या निवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले.भाजपाचे प्राबल्य असलेल्या आणि माजी मुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात भाजपाला धक्का बसला आहे.नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांपैकी महाराष्ट्र विकास आघाडीला तब्बल ४१ जागांवर विजय मिळाला आहे.तर भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.पालघर मध्येही महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपाला धक्का दिला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीला ३० तर भाजपाला १२ जागा मिळाल्या आहेत. पालघर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १२ जागांवर वियज प्राप्त करता आला आहे.१३ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.धुळ्यात भाजपाने आपला गड राखला आहे.धुळ्यात भाजपाला ३९ महाराष्ट्र विकास आघाडीला १४ जागा मिळाल्या आहेत.

नंदुरबार जिल्हा परिषदेतील ५६ जागांपैकी भाजपाला २३ तर महाराष्ट्र विकास आघाडीला ३३ जागा मिळाल्या आहेत.वाशिम जिल्हा परिषदेतही भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. या ठिकाणी भाजपाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर महाराष्ट्र विकास आघाडीला २७ जागांवर विजय मिळवता आला आहे. आघाडीच्या उमेदवारांना १५ तर अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत.अकोल्यातील जिल्हा परिषद आपल्याकडे ठेवण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला यश आले आहे.या ठिकाणी एकूण ५३ जागांपैकी वंचित बहुजन आघाडीला २२ भाजपाला ७,महाराष्ट्र विकास आघाडीला २० जागा मिळाल्या आहेत तर अपक्षांना ४ जागांवर विजय मिळवता आला आहे.

Previous articleओबीसींची जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस
Next articleवाचा….कोण आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री