प्रचारयात्रा नव्हे, ही तर विजयाची मिरवणूक!

प्रचारयात्रा नव्हे, ही तर विजयाची मिरवणूक!

मुंबई ‌नगरी टीम

श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारयात्रेबाबत दिवावासीयांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कल्याणचे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच जोरदार मुसंडी मारली असतानाच शुक्रवारी दिव्यामध्ये झालेल्या प्रचार फेरीत हजारो दिवावासीयांनी उत्स्फूर्तपणे गर्दी करत श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला. चौकाचौकात गृहिणींनी डॉ. शिंदे यांना ओवाळून त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले. डॉ. शिंदे यांच्या प्रचारासाठी दिव्यामध्ये निर्माण झालेला माहौल बघून ही प्रचाराची मिरवणूक नसून विजयाची मिरवणूक आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिवावासीयांनी दिली.

श्रीकांत शिंदे यांच्या या प्रचारयात्रेनिमित्त दिव्यामध्ये जबरदस्त माहौल निर्माण झाला होता. संपूर्ण शहरात सर्वत्र फक्त भगवे आणि निळे झेंडे दिसत होते. ज्या ज्या मार्गावरून प्रचाराचा रथ जात होता, त्या त्या मार्गावर डॉ. शिंदे यांच्या स्वागतासाठी, त्यांना पाहाण्यासाठी तुफान गर्दी उसळली होती. शिवसेना-भाजप-रिपाइं कार्यकर्त्यांबरोबरच हजारो दिवावासीय उत्स्फूर्तपणे या प्रचारयात्रेत सहभागी झाले होते. चौकाचौकात डॉ. शिंदे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सुवासिनी त्यांना ओवाळून विजयासाठी आशीर्वाद देत होत्या. ‘शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचा विजय असो’, ‘श्रीकांत शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं,’ ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणांनी दिवा नगरी दुमदुमून निघाली.

निवडणुकीतील विजयानंतर निघणाऱ्या मिरवणुकीत जसा माहौल असतो, तसाच माहौल या प्रचारयात्रेदरम्यान दिव्यात बघायला मिळाला. त्यामुळेच ही प्रचाराची यात्रा की, विजयाची मिरवणूक अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिवावासीयांकडून व्यक्त होत होती. याप्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपमहापौर रमाकांत मढवी, दिवा प्रभाग समिती सभापती शैलेश पाटील, ब्रह्मा पाटील, नगरसेवक अमर पाटील, रुपाली भगत, अंकिता पाटील, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे, सुनिता मुंडे, भाजपचे आदेश भगत, रोहिदास मुंडे, अर्चना पाटील, निलेश पाटील, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.

कल्याण पूर्व भागातील एफ केबिन फाटक, शिवाजी नगर, वालधुनी, बुद्धविहार, शिवाजी महाराज पुतळा, अंबरनाथ रोड, अशोक नगर गेट, पाठारे बुद्धविहार, उर्दू शाळा, कल्याण रोड, इंदिरा नगर, आंबेडकर चौक, रेल्वे कॉलनी या मार्गे डॉ. शिंदे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे हजारो कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. महिला आघाडी आणि मुस्लिम महिला देखील मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भगव्या आणि निळ्या झेंड्यांनी कल्याण पूर्वेतील माहौल पुरता युतीमय झाला होता. श्रीकांत शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैंच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता.
शुक्रवारी डोंबिवली पूर्व येथील शिवसेना व भाजपच्या विविध नगरसेवकांच्या प्रभागात प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शिंदे यांनी यावेळी शैलेश धात्रक, विद्या म्हात्रे, रेखा म्हात्रे, विकास म्हात्रे, प्रकाश भोईर, वृषाली जोशी, गुलाब म्हात्रे, संगीता पाटील आदी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत महापौर विनिती राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, नगरसेवक विश्वनाथ राणे, भाजप सरचिटणीस नितीन ढवळे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, रमेश म्हात्रे, भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, किशोर मानकामे आदी उपस्थित होते.
उल्हासनगर येथे आयोजित खान्देश महोत्सवात डॉ. शिंदे यांनी शेकडो उपस्थितांशी संवाद साधून उल्हासनगरच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उल्हासनगरचे उद्योजक, व्यापारी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. उल्हासनगर येथे सव्वाशे कोटी रुपयांच्या रुग्णालयाचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. डॉ. शिंदे यांनी पहिल्याच टर्ममध्ये उत्तम काम केले असून त्यांनाच पुन्हा विजयी करण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

Previous articleराज ठाकरे यांच्या जाहिर प्रचारसभा कोणासाठी ?
Next articleउमेदवारही भाड्याने आणावे लागणा-यांनी नांदेडकरांना उपदेश देऊ नये