भुजबळ कुटुंब रंगलय प्रचारात…

भुजबळ कुटुंब रंगलय प्रचारात…

मुंबई ‌नगरी टीम

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-कॉग्रेस आणि मित्रपक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या प्रगतीच्या मुद्यावर प्रचारात आघाडी घेतली असुन संपुर्ण भुजबळ कुटुंबातील सर्वच सदस्य या प्रचार यंत्रणेत रंगले असल्याचे बघावयास मिळत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाची विजयश्री खेचून, आणण्याची या परिवारातील सर्वच सदस्यांनी चंग बांधला असुन कोणत्याही परिस्थितीत नाशिकच्या प्रगतीसाठी खासदारकीची माळ समीर भुजबळ यांच्या गळ्यात पाडण्यासाठी संपूर्ण भुजबळ परिवार नाशिककर मतदारांच्या प्रत्यक्ष घराघरांत जाऊन मतदारांना समीर भुजबळ यांना मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन भुजबळ कुटुंबिय करत आहेत.

संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारतोय आणि कुणाची सरशी ठरते याबाबत नाशिककर मतदारांच्या चर्चेला उधाण आले आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक कोण येणार याबाबत जोरदार चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस कॉग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ संपुर्ण भुजबळ कुटुंबातील सदस्य नाशिक शहरासह इगतपुरी, सिन्नर, आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यासह गावपातळीवरील मतदारांच्या प्रत्यक्ष घराघरांत जाऊन भेटी घेण्यात रंगले आहे. आदल्या दिवशीच उद्याच्या दौ-याचे नियोजन झालेले असते सकाळी आठ वाजताच स्वतः आमदार छगन भुजबळ, त्यांच्या पत्नी मिना भुजबळ, उमेदवार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ, आ. पंकज भुजबळ, पंकज भुजबळ यांच्या पत्नी विशाखा भुजबळ, बहिण दुर्गाताई वाघ, समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराताई भुजबळ हा सर्व भुजबळ परिवार तयार असतात सकाळी नियोजीत दौ-याकडे या सर्वाच्या गाडीचा ताफा निघतोय. यावेळी प्रत्येक गावागावात घराघरात जाऊन माजी खासदार समीर भुजबळ यांनी सन २००९ ते २०१४ या कालावधीत केलेल्या कामाची माहिती तसेच आगामी काळात नाशिकच्या प्रगतीसाठी माहिती मतदारांना देतांना दिसत आहे.

या प्रचार दौ-याच्या काळात जेवनाची वेळ कधी होते आणि कधी वेळ निघुन जाते हे देखिल या परिवाराला लक्षात येत नाही अगदी खुपच वेळ झाली आपल्या तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन कुठलाही डामडौल बाजुला ठेवुन हा परिवार या अगदी साध्याशा कार्यकर्त्यांनी बनविलेले चटणी मिरची किंवा कांदा, भाकरी, भाजी अगदी साद्या पद्धतीने मेजवानी घेतात. यावेळी तेथील घरातील सदस्याशी मुक्तपणे चर्चा देखील करतांना बघावयास मिळत आहे.

काही राजकारणी पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या निवडणुक प्रचारासाठी स्टार प्रचारकांची गरज असते मात्र छगन भुजबळ हे स्वतःच स्टार प्रचारक असल्याने त्यांना प्रचारासाठी मतदारसंघात नागरिकांची प्रचंड मागणी असते. भुजबळ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याच्या विकासात आणि राजकीय सारीपाटावरील सर्व सैन्य अगदी बिनदिक्कतपणे बसविण्यात हातखंडा भुजबळांचा आहे. तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदीमधील राजकीय खेळी करत विकासाच्या मुद्द्यावर आपले निकटवर्तीय असलेल्यांना व्यवस्थितरीत्या ‘सेट’ करत जिल्ह्यात नावा प्रमाणेच आपली ताकद दाखवून देत असतात गावपातळीपासुन दिल्लीच्या तख्तात्याच प्रमाणे ते बहुजन समाजाचे नेतृत्व करत असल्याने ते स्वतः एक स्टार प्रचारक असल्याने भुजबळ जिथे जातील तीथे प्रचंड कार्यकर्त्यांची रेलचेल होत असते त्यामुळे भुजबळ जिथे जातील तिथे कार्यकर्ते गर्दी करत असतात.

उमेदवार समीर भुजबळ आणि डॉ. शेफाली भुजबळ हे पती पत्नी देखिल उच्चशिक्षित असल्याने त्याचप्रमाणे खासदरकीची एक टर्म पुर्ण केलेले समीर भुजबळ हे तितकेच उत्तम वक्ता, उत्तम नियोजन आणि आभ्यास पुर्वक विषयांशी सांगड घालत मतदारांना आकर्षित करत असल्याचे दिसते आहे. समीर भुजबळ यांचा बहुतांशी उच्चशिक्षित तरुणवर्ग मोठा चाहता आल्याने नवतरुण मतदारांसह तरुण मतदारांमध्ये समीर भुजबळ यांची मोठी ‘क्रेझ’ आहे. यामध्ये आमदार पंकज भुजबळ हे देखिल मागे नाही प्रचंड आध्यात्मिक मीतभाषी आणि अतिशय कमी बोलणारी व्यक्ती आणि मानसं जोडण्याची आणि ती कायमस्वरूपी टिकवुन ठेवण्याची हातोटी त्यांच्या असल्याने पंकज भुजबळ यांचे नाव चर्चेत नेहमीच असते. ते तर छगन भुजबळ यांच्या पत्नी मिना आणि समीर भुजबळ यांची बहिण दुर्गाबाई आणि यासुद्धा या प्रचार कार्यात हिरीरीने भाग घेत असतात मीनाताई भुजबळ या आपल्या समवयस्क मैत्रीणी तसेच नातेवाईक यांना सोबत घेऊन प्रचार करत असल्याचे दिसत आहे.

एकुणचसंपूर्ण भुजबळ परिवार या प्रचार कार्यात रंगून गेले आहे. कोणत्याही परिस्थितीत नाशिकची विजयश्री खेचून आणण्यासाठी हे पुर्ण भुजबळ कुटुंबिय आपल्या सर्व जिवाभावाच्या आणि हक्काच्या असलेल्या मित्र तसेच हितचिंतकांना सोबत घेऊन घराघरांत जाऊन मतदानाचा जोगवा मागत आहे नाशिकच्या प्रगतीसाठी नाशिककर सुज्ञ मतदार नक्कीच त्यांना कौल देतील हे लवकरच स्पष्ट होईल.

Previous articleसिंचन घोटाळा करणा-यांनी  एक तरी बंधारा दिला का?
Next articleरिंग रूट, सॅटिस, जलवाहतूक, मेट्रोमुळे येत्या ५ वर्षांत डोंबिवलीचा कायापालट