राजेंद्र गावीतांना सर्वसामान्यांचा वाढता पाठिंबा

राजेंद्र गावीतांना सर्वसामान्यांचा वाढता पाठिंबा

मुंबई नगरी टीम

पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी वसई विरार,  पालघर वाडासह इतर मतदारसंघातील तळागाळातील कष्टकरी सर्वसामान्यांसह स्थानिक समाजसेवी संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

मागील आठवड्यापासुन महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वरिष्ठांनी केलेल्या आवाहनानुसार स्थानिक पातळीवरील आपआपसातील मतभेद विसरून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत केलेला केलेला प्रचार, प्रसार  गावीतांसारखे सर्वांना सोबत घेवून चालणारे व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्य जनतेत त्यांच्याबद्दल असलेला आदर व आमदार, राज्यमंत्री व अल्पावधिसाठी मिळालेल्या खासदारकीतही धडाडीने विकास कामे व जनतेच्या समस्या सोडवणारा नेता नव्हे तर सामान्य कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या गावीतांना  पालघर जिल्ह्यातील वसई विरार मतदारसंघातील ख्रिस्ती मशनरीज चर्च संघटना, शेष वंशीय क्षत्रिय देवकर भंडारी समाज, पालघर वाडा बोईसर व इतर मतदार संघातून सामाजिक विकास संघटना, कुणबी सेना, आगरी सेना अशा अनेक तळागाळातील  सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचलेल्या सामाजिक संघटनांनी व संस्थांनी गावीतांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

Previous articleछप्पन इंच छातीवाल्यांची पोटेही छप्पन इंचाची झाली
Next articleमुंबईसह देशातील व्यापारी समुदाय मोदी सरकारच्या विरोधात