मुंब्र्यात शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे तुफान

मुंब्र्यात शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे तुफान

मुंबई नगरी टीम

ठाणे : काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्रा येथे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवारडॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेला जबरदस्त प्रतिसाद लाभल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुंब्रा येथील शमशाद नगर येथे आयोजित या ‘महाविजय संकल्प सभे’ला हजारो मुंब्रावासीयांनी उत्स्फूर्त गर्दी करत श्रीकांत शिंदे झिंदाबादचे नारे देत कळवा-मुंब्रा मतदारसंघ डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

डॉ. शिंदे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी रात्री मुंब्रा येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे, तर शनिवारी सकाळच्या सत्रात शीळ-तळोजा पट्ट्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघातील १४ गावांमध्ये प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंब्रा येथील सभे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे, भाजपचे जावेद अख्तर, भाजप अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्ष रिधा रशिद, मंडल अध्यक्ष कुणाल पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक बालाजी काकडे, सुधीर भगत, अस्लम कुरेशी,अविनाश पवार, विलास शिंदे, अन्वर कच्छी आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.१४ गावांमधील प्रचारयात्रेलाही तुफान प्रतिसाद लाभला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता डॉ. शिंदे यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आवर्जून संवाद साधला.

Previous articleराहुल शेवाळे यांचा विजय निश्चित: आदित्य ठाकरे
Next articleवसईत सत्ताबदल करून गुंडगिरी संपवा