पालघर आणि भिवंडीमध्ये होणार सर्वाधिक ३५ फेऱ्या

पालघर आणि भिवंडीमध्ये होणार सर्वाधिक ३५ फेऱ्या

 मुंबई नगरी टीम 

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे २३ मे रोजी निकाल येणार आहेत. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांपैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ३५ निवडणूक निकाल फेऱ्या होतील.

पालघर आणि भिवंडी – गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण ३३ निवडणूक निकाल फेऱ्या तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण ३२ निवडणूक निकाल फेऱ्या होतील. सर्वात कमी म्हणजे १७ निवडणूक निकाल फेऱ्या हातकणंगले मतदारसंघात होतील. अमरावती आणि सांगली मतदारसंघात १८ निवडणूक फेऱ्या होतील.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ८६७  उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यभरात ९७ हजार ६४० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

 

Previous articleलोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण
Next articleपिक विमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वाटप करा