शिवसेनेच्या पदरी पुन्हा ” अवजड ” निराशा

शिवसेनेच्या पदरी पुन्हा ” अवजड ” निराशा

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : एनडीए मधिल घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे १८ खासदार असतानाही त्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश करण्यात आला असला तरी खाते वाटपात शिवसेनेला अवजड उद्योग हे नेहमीचे खाते देण्यात आले आहे. मनोहर जोशी, अनंत गीते यांनी या पूर्वी भूषविलेले अवजड उद्योग हे खाते आता अरविंद सावंत यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

राज्यातील सात मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे-

नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री

अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री

पियुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री

प्रकाश जावडेकर – पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री

राज्यमंत्री

रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री

संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री

रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री

पाहा कोणाकडे कोणती खाती-

नरेंद्र मोदी – पंतप्रधान, कार्मिक, अवकाश,

राजनाथ सिंह – संरक्षण

अमित शाह – गृह

नितीन गडकरी – भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

सदानंद गौडा – रसायने आणि खते

निर्मला सीतारमन – अर्थ, कॉर्पोरेट अफेअर्स

रामविलास पासवान – ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा

नरेंद्र सिंह तोमर – कृषी, ग्रामविकास आणि पंचायत राज

रवीशंकर प्रसाद – विधी आणि न्याय, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया उद्योग

थावरचंद गहलोत – सामाजिक न्याय

सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार

रमेश पोखरियाल निशंक- मनुष्यबळ विकास

अर्जुन मुंडा – आदिवासी विकास

स्मृती इराणी – वस्त्रोद्योग, महिला आणि बालकल्याण

डॉ. हर्षवर्धन – आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूगर्भ संशोधन

प्रकाश जावडेकर – पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण

पियुष गोयल – रेल्वे, वाणिज्य उद्योग

धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पोलाद

मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक विकास

प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण

महेंद्रनाथ पांडे – कौशल्य विकास, उद्योजकता विकास

अरविंद सावंत – अवजड उद्योग

गिरीराज सिंह – पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग

गजेंद्र सिंह शेखावत – जलशक्ती

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

संतोष गंगवार – कामगार

इंद्रजीत सिंह – सांख्यिकी, कार्यान्वयन, नियोजन

श्रीपाद नाईक – आयुष, संरक्षण राज्यमंत्री

जितेंद्र सिंह – ईशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, अणूशक्ती विकास, अवकाश संशोधन

किरन रीजिजू – क्रीडा आणि युवा कल्याण, अल्पसंख्याक

प्रल्हाद पटेल – सांस्कृतिक आणि पर्यटन

आर के सिंह – ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, कौशल्यविकास

हरदीपसिंह पुरी – गृहनिर्माण आणि नगरविकास, हवाई वाहतूक, वाणिज्य उद्योग

मनसुख मांडवीय – जल वाहतूक, रसायन आणि खते

राज्यमंत्री

फग्गनसिंह कुलस्ते – पोलाद

अश्विनीकुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण

अर्जुन मेघवाल – संसदीय कार्य आणि अवजड उद्योग

व्ही के सिंह – भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग

कृष्णपाल गुर्जर – सामाजिक न्याय

रावसाहेब दानवे – ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा

किशन रेड्डी – गृह

पुरुषोत्तम रुपाला – कृषी

रामदास आठवले – सामाजिक न्याय

साध्वी निरंजन ज्योती – ग्रामविकास

बाबुल सुप्रियो – वने पर्यावरण

संजीव कुमार बालियान – पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग

संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

अनुराग ठाकूर – अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स

सुरेश अंगडी – रेल्वे

नित्यानंद राय – गृह

रतनलाल कटारिया – जलशक्ती आणि सामाजिक न्याय

वी मुरलीधरन – परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कार्य

रेणुका सिंह सरुता – आदिवासी विकास

सोमप्रकाश – वाणिज्य आणि उद्योग

रामेश्वर तेली – अन्नप्रक्रिया उद्योग

प्रतापचंद्र सारंगी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग

कैलाश चौधरी – कृषी

देबश्री चौधरी – महिला आणि बालकल्याण

 

Previous articleजाणून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळाची यादी
Next articleशरद पवार लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेणार