शरद पवार लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेणार

शरद पवार लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेणार

मुंबई नगरी टीम

 मुंबई :  नुकत्याच  झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या  शनिवारी १ जून रोजी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार असून त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस २० जागा लढविल्या होत्या त्या पैकी सातारा, बारामती, रायगड आणि शिरूर या जागांवर विजय मिळविता आला तर अन्य जागांवर मोठा पराभव पत्करावा लागला.या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक उद्या  शनिवारी १ जून रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार असून, या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात येवून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात येणार आहे.या बैठकीनंतर तर दुपारी २ वाजता पक्षाची सर्वसाधारण बैठक होणार असून त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले उमेदवार व कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॉग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या वृत्तांत  तथ्यता नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट करीत काल कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.या भेटीनंतर याबाबत उलटसुलट बातम्यांचे पेव फुटले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॉग्रेस पक्षात विलिन करणार अशा होत्या त्यावर बोलताना  मलिक यांनी दोन्ही नेत्यांच्या भेटीची स्पष्टता माध्यमांशी बोलताना मांडली. शरद पवार आणि  राहुल गांधी यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यात पडलेला भीषण दुष्काळ यावर सविस्तर चर्चा झाली अशी माहितीही मलिक यांनी यावेळी दिली.

Previous articleशिवसेनेच्या पदरी पुन्हा ” अवजड ” निराशा
Next articleमुंबईतील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंबंधी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटणार