मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राला सुधारित प्रस्ताव पाठवा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राला सुधारित प्रस्ताव पाठवा

 मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा, यासाठी केंद्र सरकारला पाठविलेल्या प्रस्ताव अधिक मजबूत बनवून पुन्हा पाठवावा, अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात केली. या विषयांवरील चर्चेदरम्यान त्यांनी मराठी भाषेला अधिक समृद्ध बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासनाला पाठविलेल्या प्रस्ताव अपूर्ण असल्याचे समजते. त्याचा अभ्यास करून, त्यातील त्रुटी दूर करून, तसेच त्याला आवश्यक त्या पाठपुराव्याची जोड देऊन, हा प्रस्ताव भक्कम बनवावा’, असेही त्यांनी म्हटले आहे. शासनाचा कारभार, मुंबई महापालिकेचा कारभार मराठीतून चालतो. पण अनेक परिपत्रके इंग्रजीमधून जारी केली जातात. पण मुंबईत मराठी नागरिकांना ती समजावीत, बिल्डिंग असो वा झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशाना इंग्रजी काळात नसेल आणि त्यांना परिपत्रक अथवा नोटीस पाठविली तर त्यांना काही कळणार नाही. यासाठी ज्या अधिकाऱ्याना मराठी येत  नसेल तर त्या अधिकाऱ्यांना मराठीचे प्रशिक्षण द्यावे. त्यांना मराठी येणे आवश्यक आहे,’ अशी मागणीही आमदार दरेकर यांनी यावेळी केली.

मराठी भाषेला अधिक चांगल्या प्रकारे समृद्ध व संपन्न बनविण्यासाठी मराठी भाषा विभाग व संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे आपल्या कार्यकीर्दीत प्रामाणिकपणे प्रयत्न करून योग्य निकाल देतील,” अशी खात्री आमदार दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.मराठी भाषेच्या समृद्धीसाठी नव्या ग्रंथालयांना सुद्धा अनुदान देण्यात यावे, अशी जोरदार मागणी करून आमदार प्रवीण दरेकर यांनी, ‘बंद पडलेल्या अथवा फक्त कागदोपत्री असणाऱ्या ग्रंथालयांची चौकशी करावी. रंग भवन येथे मराठी भाषा भवन करण्याची कार्यवाही तातडीने करावी. तसेच गाड्यांच्या नंबरप्लेटवर मराठी नंबर टाकल्यास दंड केला जातो. याबाबत कायद्यात बदल करून मराठी नंबर वापरण्यास परवानगी देण्यात यावी,’ अशा मागण्याही त्यांनी केल्या.

Previous articleकोंढवा प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
Next articleवांद्रे वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी शासन सकारात्मक