चैत्यभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही
मुंबई नगरी टीम
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला समतेचा व न्यायाच्या मार्गानी सरकार वाटचाल करीत आहे.बाबासाहेब आंबेडकर याची प्रेरणा व मार्गदर्शन तत्वे अंगीकृत करून समाजाचा व देशाचा विकास होणार आहे.बाबासाहेब याची स्मृती स्थळ चैत्यभूमी,दिक्षाभुमी अशा स्थळांना विकासासाठी शासन स्तरावरून निधी कमी पडू देणार नाही असे उदगार आज दादर चैत्यभूमीला भेट दिल्यानंतर डॉ सुरेश खाडे यांनी काढले.
सामाजिक न्याय विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर आज चैत्यभूमीला भेट देऊन तेथील विकास कामांचा आढावा घेतला.यावेळी या भागातील आमदार भाई गिरकर , तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते.दादर चैत्यभूमी याठिकाणी दर वर्षी सहा डिसेंबर रोजी लाखों बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात त्यांना यावेळी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे या बाबतीत आढावा घेण्यात आला.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन ठरतात त्यामुळे त्यांच्या विचारांची मशाल सतत ठेवत ठेवण्यासाठी या ठिकाणी भीम ज्योत उभारण्यात येणार आहे त्या जागेची पाहणी यावेळी करण्यात आली आहे अशी माहिती मंत्री खाडे यांनी दिली.