……तर डॉ.आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षांत पुर्ण: शरद पवार

……तर डॉ.आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षांत पुर्ण: शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : इंदू मिलच्या जागेवर होणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकाचे काम आव्हान म्हणून स्वीकारले तर हे काम दोन वर्षांत पुर्ण व्हायला अशक्य नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवार केली.त्यांच्या समवेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे,आमदार विद्या चव्हाण, आदी उपस्थित होते.स्मारकाच्या जागेवर आतापर्यंत २५ टक्के काम झाले आहे.अजून ७५ टक्के काम बाकी आहे. या स्मारकाचे काम करणारी संस्था आंतरराष्ट्रीय आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर हे स्मारक अत्यंत आकर्षक राहणार आहे.जगात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आहे.अगदी चीन बौद्ध समाज असल्याने या स्मारकाचे आकर्षण राहणार आहे.बौद्ध विचारांची आस्था असणा-यांना हे स्मारक महत्वाचे असणार आहे.त्यामुळे ज्यांनी घटना दिली त्या महामानवाच्या दर्शनाला जगातील लोक आल्याशिवाय राहणार नाही असेही पवार म्हणाले.

स्मारकासंदर्भात मी काही सूचना केल्या नाहीत.पण मला ६ डिसेंबर आणि १४ एप्रिल या दोन तारखा समोर दिसतात.लाखो लोक इथे येतात.सगळा घटक बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भारावून जाईल असेही पवार यांनी सांगितले.महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून,त्यामध्ये इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचा समावेश आहे.शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या प्रतिकृतीची आणि त्यानंतर त्यांनी स्मारकाच्या जागेचीही पाहणी केली.

Previous articleमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी : शिर्डीकरांचा बंद मागे
Next articleइंग्रजी माध्यमांच्या शाळांना दणका ; मराठी विषय होणार सक्तीचा