सोफीटेल हॉटेलच्या बाहेर युवक काँग्रेसची निदर्शने

सोफीटेल हॉटेलच्या बाहेर युवक काँग्रेसची निदर्शने

 मुंबई नगरी टीम   

मुंबई : कर्नाटक राज्यातील सत्ताधारी काँग्रेसच्या आठ तर जेडीएसच्या तीन आमदारांनी काल राजीनामा दिला असून, राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये  थांबले आहेत, या हॉटेलच्या बाहेर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे  अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांनी दिलेला राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी या युवक कार्याकर्त्यांनी केली.  महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर सोफिटेल हॉटेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर हॉटेलच्या दिशेने येणाऱ्या सर्व रस्त्यांवरही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सत्ताधारी काँग्रेसच्या आठ तर जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या  १३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार धोक्यात आले आहे.

Previous articleआमदार प्रवीण दरेकर यांच्या जनसंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद 
Next articleहरिनामाचा जयघोष करीत  मंत्री विनोद तावडे रमले वारीत