गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी :  ५०९० घरांची लॉटरी 

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी :  ५०९० घरांची लॉटरी 

मुंबई नगरी टीम

मुंबई :  म्हाडाकडून मुंबईत गिरणी कामगारांच्या घरासाठी ५ हजार ९० घरांची लॉटरी काढण्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज केली आहे. त्याशिवाय राज्यभरात १४ हजार ६२१ घरांसाठी येत्या १५ ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्याने लॉटरी काढण्यात येणार आहे.

 गिरणी कामगारांसाठी महत्वपूर्ण घोषणा आज म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. मुंबईत फक्त गिरणी कामगारांसाठी ५०९० घरांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा सामंत यांनी केली. म्हाडाकडून लवकरच नवीन पुनर्विकास धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात एकूण १४ हजार ६२१ घरांची लॅाटरी १५ ऑगस्ट पूर्वी काढण्यात येणार आहे. पुण्यात २०००,नाशिक मध्ये ९२ ,औरंगाबाद मध्ये १४८,कोकणात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ५३०० ,नागपूर मध्ये ८९८,अमरावती मध्ये १२००, घरे म्हाडाकडून बांधण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

Previous articleराष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरांचा राजीनामा ; शिवसेनेत प्रवेश करणार
Next articleरिक्षा चालक मालकांसाठी  लवकरच कल्याणकारी मंडळाची घोषणा