सुरक्षित व पारदर्शक  ऑनलाईन प्रणालीमुळे म्हाडात दलालांना थारा नाही

सुरक्षित व पारदर्शक  ऑनलाईन प्रणालीमुळे म्हाडात दलालांना थारा नाही

मुंबई नगरी टीम

रत्नागिरी : सुरक्षित आणि पारदर्शक ऑनलाईन प्रणालीमुळे म्हाडात दलालांना थारा नसल्याची ग्वाही म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी येथे गिरणी कामगारांना म्हाडाची ऑनलाईन प्रणालीची कार्यपद्धती समजावी यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आज रत्नागिरी येथिल अल्पबचत सभागृहात गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या ऑनलाईन प्रणाली आणि घरांच्या सोडती विषयी माहिती देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला रत्नागिरी आणि  जिल्ह्यातील गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हाडाच्या घराची ऑनलाईन सोडत कशा पद्धतीने काढली जाते याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना  ऑनलाईन सोडत काढताना सुरक्षित व पारदर्शक  प्रणालीमुळे म्हाडात दलालांना थारा नसल्याची ग्वाही गिरणी कामगारांना देवून गिरणी कामगारांच्या समस्या समजावून घेवून त्यांचे निरसन केले.गिरणी कामगारांच्या मनात असलेल्या अनेक समस्यांची माहिती घेवून आ. सामंत यांनी त्यांची सोडवणूक केल्याने अनेक वर्षे घरांच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना धन्यवाद दिले. यावेळी गिरणी कामगार विभाग म्हाडाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गावित,उप कार्यकारी अधिकारी किरण कासणे,छाननी अधिकारी रविंद कुकडे,पेडणेकर,आय.टी विभागाप्रमुख गीतांजली कांबळे आदी उपस्थित होते.

Previous articleभाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे मुंबईत जोरदार स्वागत
Next articleसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक