मी शिवसेनेत जाणार नाही : छगन भुजबळ

मी शिवसेनेत जाणार नाही : छगन भुजबळ

मुंबई नगरी टीम

नाशिक  : शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचे वृत्त राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फेटाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती. भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना शिवसेना प्रवेशाची शक्यता फेटाळली आहे.

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये होती. मात्र, ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त छगन भुजबळ यांनी फेटाळले आहे. शिवबंधन हाती बांधण्याचे वृत्त निव्वळ अफवा असल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.सचिन अहिर यांच्याविषयी मला माहिती नाही. पण मी शिवसेनेत जाणार नाही, असे भुजबळ यांनी सांगितले. येत्या २७ तारखेला  छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा  होत्या.

Previous articleराष्ट्रवादी तोडण्याचे नव्हे तर; शिवसेना वाढविण्याचे काम करणार
Next articleश्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारणेसाठी समिती