निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे परंतु शिवसेनेने पडणारा नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू असा  विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सचिन अहिर आणि शिवसेनेवर तोफ डागली.सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला यांचे पक्षाला आणि नेत्यांना दु:ख झाले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडून विश्वासघात होत असेल तर ती गोष्ट नक्कीच दु:ख करणारी आहे असेही  मलिक म्हणाले. सचिन अहिर शिवसेनेत गेले असले तरी त्यांच्यासोबत वरळीतील एकही कार्यकर्ता गेलेला नाही हेही  मलिक यांनी स्पष्ट केले. पक्षाने १५ वर्ष मंत्रीपद आणि १५ वर्षे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. परंतु मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे असा आरोपही मलिक यांनी केला. सचिन अहिर शिवसेनेत गेले आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही नव्याने, ताकदीने पक्ष मुंबईत उभा करु आणि मुंबईत जास्तीत जास्त यश मिळवून देवू असा आत्मविश्वासही  मलिक यांनी व्यक्त केला.

Previous articleवरळीचा पुढचा आमदार मीच असेन : सुनील शिंदे
Next articleधनगर समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदानावर शेळ्या मेंढीचे वाटप