वरळीचा पुढचा आमदार मीच असेन : सुनील शिंदे

वरळीचा पुढचा आमदार मीच असेन : सुनील शिंदे

मुंबई नगरी टीम

मुंबई : आज राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला मात्र कोणाचा प्रवेश होत आहे हे माहित नाही. परंतु यापुढेही मीच वरळीचा आमदार असेन, असे सूचक वक्तव्य  वरळीचे शिवसेना आमदार सुनिल शिंदे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यापूर्वी मातोश्री निवासस्थानाजवळ पत्रकारांनी अहिर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल विचारले असता वरळीचे शिवसेना आमदा सुनील शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या वृत्तानंतर शिवसेनेत अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.सचिन अहिर हे मातोश्रीवर पोहतल्यानंतर काही वेळातच आमदार सुनिल शिंदे यांचे आगमन झाले. आ.शिंदेंना अहिर यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, “कोणाचा प्रवेश होतोय हे मला माहित नाही. सामान्य शिवसैनिकाप्रमाणे येथे आलो आहे. परंतु पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो पक्षाच्या हिताचा असेल.” तसेच  अहिर यांना वरळीतून उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार, या प्रश्नावर सुनील शिंदे यांनी “आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन, असे सूचक वक्तव्य केले.

 २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांचा  पराभव केला होता.मात्रअहिर यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेसाठी आपल्या उमेदवारीला धोका निर्माण होण्याची भीती सुनील शिंदे यांच्या मनात असली तरी सचिन अहिर यांना भायखळामधून विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात आमदार सुनिल शिंदे यांनी विकास कामांचा लावलेला धडाका पाहता या मतदारसंघातून सुनिल शिंदे यांनाच संधी दिली जाईल अशी शक्यता आहे.

Previous articleश्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारणेसाठी समिती
Next articleनिवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश