६७ ग्रामपंचायतींसाठी ३१ ऑगस्ट रोजी मतदान

६७ ग्रामपंचायतींसाठी ३१ ऑगस्ट रोजी मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील विविध १४ जिल्ह्यांमधील ६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर २ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी ३१ ऑगस्ट  रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

 

सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. १ ऑक्टोबर  ते १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण ६७ ग्रामपंचायतींसाठी या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे ९ ते 1१६ ऑगस्ट २०१९ या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १९ ऑगस्ट २०१९ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्ट २०१९ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान ३१ ऑगस्ट  रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी ३ सप्टेंबर  रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- ६, रायगड- ९, रत्नागिरी- ४, सिंधुदुर्ग- ३, नाशिक- २५, धुळे- १, सातारा- ४, सोलापूर- १, कोल्हापूर- १, उस्मानाबाद- ३, अकोला- २, यवतमाळ- १, वर्धा- ५, आणि चंद्रपूर- २. एकूण- ६७.

Previous articleआता मुंबई ते पुणे प्रवास होणार केवळ २३ मिनिटांत
Next articleभाजपात  काँग्रेस राष्ट्रवादीची “मेगाभरती”