भाजपात  काँग्रेस राष्ट्रवादीची “मेगाभरती”

भाजपात  काँग्रेस राष्ट्रवादीची “मेगाभरती”

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. आमदारकीचा राजीनामा दिलेले जावळीचे शिवेंद्रराजे भोसले,वैभव पिचड, संदीप नाईक,कालिदास कोळंबकर यांच्यासह चित्रा वाघ नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. माजी मंत्री गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक मात्र या पक्षप्रवेशाकडे फिरकले नाहीत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची मेगाभरती आज भाजपमध्ये पार पडली. या मेगा भरतीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत चर्चगेटजवळील गरवारे पव्हेलियन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले कालिदास कोळंबकर तर राष्ट्रवादीला रामराम केलेले शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड यांच्यासह त्यांचे वडील माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही भाजपची वाट धरली आहे. ऐरोलीचे राष्ट्रवादीचे संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांच्याह महात्मा जोतिबा फुले यांच्या वंशज नीता होले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेले राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबईतील ५२ नगरसेवकांनी आज भाजपात प्रवेश केला नाही.काही दिवसात नवी मुंबईत भाजप प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमात गणेश नाईक आणि नगरसेवक प्रवेश करणार असल्याचे समजते.

Previous article६७ ग्रामपंचायतींसाठी ३१ ऑगस्ट रोजी मतदान
Next articleमुख्यमंत्री म्हणाले… आम्ही वैभव पिचडांना आधी पकडले नंतर मधुकर पिचडांना