पुराचे पाणी घरात शिरल्यास आता मिळणार १० हजाराची भरपाई

पुराचे पाणी घरात शिरल्यास आता मिळणार १० हजाराची भरपाई

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीमध्ये २ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात बुडाले असल्यास, घर पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा घरांचे पूर्णत: नुकसान झाले असल्यास कपडे, भांडी, घरगुती वस्तुंसाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते. अशा प्रकारच्या नुकसानीसाठी शासनाकडून प्रति कुटुंब ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. या अर्थसहाय्याच्या रक्कमेत २०१९ या वर्षासाठी शासनाकडून भरीव वाढ करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागासाठी १० हजार रुपये प्रति कुटुंब व शहरी भागासाठी १५ हजार रुपये प्रति कुटुंब मदत म्हणून देण्यात येणार आहे. यावर्षी २६ जुलै २०१९ नंतर ज्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन घरामध्ये पाणी शिरले व ज्यांचे नुकसान झाले आहे केवळ त्यांनाच  ही मदत दिली जाणार आहे. ही मदत या घटनांपुरतीच मर्यादित राहणार आहे.

Previous articleजिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडणुका चार महिने पुढे ढकलल्या
Next articleधनंजय मुंडेंचे हजारो शेतक-यांसह भर पावसात ठिय्या आंदोलन