१५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक !
मुंबई नगरी टीम
नागपूर : राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असतानाच राज्यात आचारसंहिता केव्हा लागू केली जाणार यावर आडाखे बांधू लागले असतानाच राज्यात विधानसभेच्या निवडणूका या १५ ऑक्टोबर दरम्यान होतील असे भाकित राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्तविले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात अनेक पक्षात इनकमिंग सुरू असताना आता राज्यात निवडणूकांची आचारसंहिता केव्हा लागू होणार यावर चर्चा सुरू असतानाच राज्यात १५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक होईल असे भाकित राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्तविले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता १२ सप्टेंबरच्या दरम्यान लागणार लागू शकते तर १५ ऑक्टोबर दरम्यान निवडणूक हो असे भाकित वर्तवितानाच २०१४ मध्येही याच काळात निवडणूक झाली होती असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. परवाच झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत सरकारने तब्बल २५ महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. गणेशोत्सवानंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात येतील. सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या किमान तीन बैठका होण्याची शक्यता आहे.