चकमकफेम प्रदीप शर्मांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई नगरी टीम
मुंबई : पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.नालासोपारा मतदारसंघातून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी गृह मंत्रालयाकडे अर्ज केला होता. परवाच त्यांचा हा अर्ज मंजूर करण्यात आल्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.त्यानंतर त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. प्रदिप शर्मा हे शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.