युतीच्या घोषणे अगोदरच शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

युतीच्या घोषणे अगोदरच शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : शिवसेना-भाजप युतीची घोषण होणे बाकी असतानाच शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म वितरित केले आहेत. मराठवाड्यातील पैठण, औरंगाबाद, जालना, हिंगोली, तर कोल्हापुरातील हातकणंगले, रत्नागिरी, पिंपरी, आणि मुंबईतल्या शिवडी या मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या उमेदवारांची यादी निश्चित होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत.भाजपची पहिली यादी आज जाहीर केली जावू शकते.तर दुसरीकडे शिवसेना भाजप युतीची घोषणा होणे बाकी असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले आहेत.

आज एबी फॉर्मचे वाटप झालेले उमेदवार (कंसात मतदार संघ)

राजेश क्षीरसागर -( कोल्हापूर), संग्राम कुपेकर चंदगड (कोल्हापूर), संदीपान भुमरे – (पैठण)
संजय शिरसाट (औरगाबाद पश्चिम),अर्जुन खोतकर (जालना),सुजित मिणचेकर (हातकणंगले कोल्हापूर), संतोष बांगर ( हिंगोली),अजय चौधरी – शिवडी (मुंबई)
गौतम चाबुकस्वार – पिंपरी (पुणे)
उदय सामंत ( रत्नागिरी), भास्कर जाधव (गुहागर), योगेश कदम ( दापोली), राजन साळवी ( राजापूर), अनिल बाबर – खानापूर-आटपाडी (सांगली),अनिल कदम – निफाड (नाशिक),योगेश घोलप – देवळाली (नाशिक), राजाभाऊ वाजे – सिन्नर (नाशिक)
यामिनी जाधव – भायखळा (मुंबई).

 

Previous articleकाँग्रेसच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर;वाचा कोणाला लागली लाॅटरी
Next articleकाँग्रेसला धक्का ; सहा आमदार आज भाजपात प्रवेश करणार