अजितदादा शॉर्ट फॉर्ममध्ये कोणत्या नेत्याला म्हणाले “चंपा”

अजितदादा शॉर्ट फॉर्ममध्ये कोणत्या नेत्याला म्हणाले “चंपा”

मुंबई नगरी टीम

मुंबई :  उमेदवारी माघारी घेण्याच्या मुदतीनंतर आता प्रचार रंग धरू लागवा आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीआज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये भाजपाच्या दिग्गज नेत्याची शॉर्ट फॉर्ममध्ये खिल्ली उडवली. एका प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांनी “त्या ‘चंपाला” पवारांशिवाय काही दिसत नाही, असा टोला लगावला. त्यानंतर त्यांनी चंपा म्हणजे नक्की कोण याचेही स्पष्टीकरण दिल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ माजला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रसामाध्यमांच्या प्रतिनिधींना अजितदादांना अनेक प्रश्न विचारले.पवार परिवारातील अनेक तरूण भविष्यात भाजपमध्ये येवू शकतात या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविषयी अजितदादांना छेडले.यावर प्रश्नावर अजितदादांनीही तेवढ्याच मिश्किल भाषेत उत्तर  दिले. त्या “चंपाला” पवारांशिवाय काहीच दिसत नाही असे अजितदादा म्हणाले. हा शॉर्ट फॉर्म आहे जस अप म्हणजे अजित पवार, तस चंपा असे त्यांनी स्पष्टीकरणही लगेच दिले. ते (चंपा ) जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक वेळेस राजकारणातून शरद पवार दूर जातील असे ते म्हणतात. साहेबांनी ( शरद पवार) अनेक चढउतार पाहिले आहेत. ५५ आमदार असताना त्यातील ५० आमदार पक्ष सोडून गेले. केवळ पाच आमदार राहिले तरीही तितक्याच तत्परतेने साहेब ( शरद पवार) बाहेर पडले. आजही ते आक्रमक भूमिकेतून सध्याचे सरकार बदलायचे असे सांगतात, असे अजितदादांनी सांगितले.

Previous article१ कोटी तरूण मतदारांच्या हाती सत्तेची दोरी
Next articleपावसामुळे राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द