१ कोटी तरूण मतदारांच्या हाती सत्तेची दोरी

१ कोटी तरूण मतदारांच्या हाती सत्तेची दोरी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील पुढील सरकार कोणाचे हे राज्यातील १८ ते २५ वयोगटातील १ कोटी ६ लाख ७६ हजार १३ तरुण ठरविणार आहेत. १ कोटी पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ६० लाख ९३ हजार ५१८ युवक तर ४५ लाख ८१ हजार ८८४ युवती आहेत. ६११ तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.

राज्यात ४ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये ८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१  मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण ५ हजार ५६० अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष ४ हजार ५४ आहेत तर १ हजार ५०६ अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.

Previous article२८८ जागांसाठी ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात
Next articleअजितदादा शॉर्ट फॉर्ममध्ये कोणत्या नेत्याला म्हणाले “चंपा”