प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे किंवा इतर पक्षांसोबत न जाता भाजपसोबत यावे

मुंबई नगरी टीम

शिर्डी । महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा तळागाळातील अन्यायग्रस्त अनुयायांना न्याय मिळवुन देणारा एकमेव पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष असून, आम्ही ज्यांच्या सोबत उभे राहिलो तो पक्ष सत्तेत येतोच मग तो काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, रिपाइं फक्त सत्ते बरोबर जाणारा पक्ष नसून तर सत्ता हस्तगत करणारा पक्ष आहे. ही किमया फक्त आणि फक्त रिपाइं पक्षातच आहे.सद्याच्या भाजप सरकारमध्येही रिपाइंची महत्वाची भूमिका आहे.प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे किंवा इतर ठिकाणी न जाता माझ्या सोबत भाजपकडे यावे.आम्ही दोघांनी ही भाजपशी युती केल्यास आपल्या समाजाला त्यातुन सत्तेचा मोठा लाभ मिळवून देता येईल, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

शिर्डी येथे आयोजित रिपाइंच्या राष्ट्रीय अधिवेशनाप्रसंगी रामदास आठवले बोलत होते. विचारमंचावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार स्वबळावर निवडून आले.मग महाराष्ट्रात आरपीआयचे आमदार का निवडून येऊ शकत नाहीत.कार्यकर्त्यांनी आपले आमदार निवडून येण्यासाठी शिस्तबद्ध काम करावे असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे किंवा इतर ठिकाणी न जाता माझ्या सोबत भाजप कडे यावे. आम्ही दोघांनी ही भाजप शी युती केल्यास आपल्या समाजाला त्यातुन सत्तेचा मोठा लाभ मिळवून देता येईल असे आवाहन आठवले यांनी केले. मी येथे हार तुरे घेण्यासाठी आलो नाही तर पक्षाचे ध्येय धोरणे राबविण्यासाठी आलो आहे. आज आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे.पुष्पहार घालून क्रांती होत नाही. नागालँड मध्ये रिपाइंचे दोन आमदार निवडुन येतात मग महाराष्ट्रात का नाही ? याचे आत्मचिंतनही कार्यकर्त्यांने करणे गरजेचे आहे असेही आठवले म्हणाले.डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचे ख-या अर्थाने विचार रुजवायचे असतील तर स्वयंशिस्त महत्वाची आहे. ते पुढे म्हणाले आज झालेल्या नविन संसद भवनाचे उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण आहे. या वास्तुमुळे देशाच्या वैभवात भर पडली आहे असे आठवले म्हणाले.

यावेळी बोलतांना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,आपल्या सर्वांचे नेते रामदास आठवले राजकारणात मैत्री जपणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांचा पिंड संघर्षाचा आहे. एन.डी.ए. मधून अनेक पक्ष बाहेर पडले, पण जनतेच्या विकासासाठी आठवले बाहेर पडले नाही. स्वाभीमानाने राहिले. कार्यकर्त्यांनी त्यांना शिर्डी मधून निवडून आणण्याची काळजी करु नये. त्यासाठी भाजप सक्षम आहे. इंदू मीलमध्ये उभारण्यात आलेले डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक सर्व समाजाला समर्पित आहे. या स्मारकातून बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेणा-या अनेक पिढया घडतील.असे विखे पाटील म्हणाले.

Previous articleभाजपा राज्यभरात ‘मोदी @ ९’ अभियान राबवणार : आ. प्रविण दरेकर यांची माहिती
Next articleमोदी सरकारने जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले