शरद पवार संजय राऊतांच्या भेटीने खळबळ
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना भाजपातील सत्तेचा पेच कायम असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमच्यामध्ये राज्यातील राजकारणावरही चर्चा झाली असे खा. राऊत यांनी सांगितले असले तरी हा भाजपावर दबाव टाकण्याचे तंत्र असल्याचे बोलले जाते. राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असतानाच पवार राऊत भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निकालानंतर शिवसेनेने आम्हाला सत्तास्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटले होते.या निमित्ताने शिवसेनेकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. शिवसेना समसमान फॉर्म्युला ठाम आहे तर भाजपाने हा फॉर्म्युला फेटाळला आहे.