शरद पवार धनंजय मुंडे करणार पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी

शरद पवार धनंजय मुंडे करणार पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची येत्या बुधवारी पाहणी करणार आहेत.

यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील  शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना धीर देण्यासाठी स्वतः पवार हे येत्या बुधवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत . आपल्या या दौ-यात पवार हे परभणी,  हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  त्यांच्यासोबत या दौ-यात असणार आहेत. येत्या बुधवार दुपारी बारा वाजता ते सर्वप्रथम सेलू व परिसरातील नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर परभणी व परिसरातील व त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

Previous articleहेरगिरी थांबवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे राज्यपालांना साकडे
Next articleशरद पवार संजय राऊतांच्या  भेटीने खळबळ