मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट

मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मंत्री सामंत यांनी पवार यांची भेट घेतली हि सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मंत्री सामंत यांनी पवार यांची भेट घेतली.आपल्या या सदिच्छा भेटीत मंत्री सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. पवार यांच्या भेटीनंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जावून भेट घेतली.राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागातील समस्यासंदर्भात त्यांनी यावेळी चर्चा केली. तसेच रत्नागिरी येथे येण्यासंदर्भात राज्यपालांना निमंत्रण दिले.राज्यपाल कोश्यारी यांनी मंत्री सामंत यांच्या विनंतीला मान देऊन रत्नागिरीत लवकरच येण्याबाबत ग्वाही देताना मार्च महिन्यामध्ये रत्नागिरीत येण्याचे संकेत दिले.

Previous article“गाव तिथे काँग्रेस” अभियान राबवणार :बाळासाहेब थोरात
Next articleउदयनराजे भोसलेंना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक