महापोर्टल तात्काळ बंद करण्याची रोहित पवार यांची मागणी

महापोर्टल तात्काळ बंद करण्याची रोहित पवार यांची मागणी

मुंबई नगरी टीम

नागपूर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापोर्टलला स्थगिती दिली असली तरी ते महापोर्टल तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी औचित्याचा मुद्दयाद्वारे आज विधानसभेत केली.

महापोर्टलला स्थगिती दिल्याबदद्ल रोहित पवार यांनी  मुख्यमंत्र्यांचे आभार मानतानाच हे महापोर्टल आणि परिक्षा पद्धतही बंद करण्याची मागणी  केली.एमपीएससीच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी करतानाच महापोर्टलमध्ये प्रचंड घोळ आहे. ज्या कंपनीला कंत्राट दिले त्याच्या शासन आदेश आणि निविदेत मोठी तफावत आहे अशी माहितीही आमदार रोहित पवार यांनी दिली.महापोर्टलने घेतलेल्या परीक्षेदरम्यानची सीसीटीव्ही फुटेज टेप मिळत नाही. शिवाय वनविभागाची परीक्षा शारीरिक क्षमता न बघता केवळ लेखी परीक्षेद्वारे नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या पोर्टलचा कारभार योग्यरित्या सुरू नसल्याचे  स्पष्ट होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत एक बैठक बोलवावी व तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणीही आमदार  पवार यांनी केली.

Previous articleभाजपने देशातील सामाजिक एकतेला नख लावले
Next articleमागासवर्गीय विभागाच्या खर्चासाठी कर्नाटक आंध्रप्रदेशाच्या धर्तीवर कायदा