मंत्रिमंडळाचा विस्तार २४ तारखेला का होवू शकला नाही ! बाळासाहेब थोरातांनी सांगितले हे कारण

मंत्रिमंडळाचा विस्तार २४ तारखेला का होवू शकला नाही ! बाळासाहेब थोरातांनी सांगितले हे कारण

मुंबई नगरी टीम

मुंबई : हिवाळी अधिवेशन संपताच दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार पुढे ढकलला गेला.विस्ताराच्या विलंबासाठी काँग्रेस पक्षाच्या यादी तयार नसल्याचे कारण असल्याची चर्चा होती. मात्र शपथविधी टाळण्यास प्रशासन कारणीभूत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दोन दिवसात म्हणजे २४ डिसेंबरला होणार अशी चर्चा होती.या विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची यादी तयार होती मात्र काँग्रेस पक्षाची यादी तयार नसल्याने २४ डिसेंबरला होणार विस्तार होवू शकला नाही याला काँग्रेस कारणीभूत असल्याची चर्चा होती.विस्ताराच्या यादीच्या विलंबावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नाव न घेता टीका केली होती.याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी २४ तारखेला होणा-या शपथविधी टाळण्यामागचे कारण स्पष्ट केले. विस्तारासाठी काँग्रेसची यादी तयार होती. प्रशासनाने शपथविधीच्या तयारीसाठी किमान ४८ तास मागितले होते, त्यासाठीच २४ तारखेला शपथविधी होऊ शकला नाही.शपथविधी टाळण्यामागे प्रशासनाने मागितलेली वेळ हेच कारण होते, दुसरे कोणतेही कारण नाही असे थोरात यांनी सांगितले.विस्ताराचे घोडे उपमुख्यमंत्रीपदावरून आडले असल्याची चर्चा होती.त्याबाबत त्यांनी याचे उत्तर आपल्या मिश्किल शैलित देताना, तसे चालवायला काहीच हाकरत नाही असे सांगितले.माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपण राष्ट्रवादीतच असल्याचे वक्तव्य केले त्याबाबत बोलताना थोरात म्हणाले,सहाजिकच गोष्टी असतात आपण चुकलो असे वाटते त्यातून अनेक जण आमची नाळ तुमच्या पक्षाशी जोडली गेली आहे असे सांगतात.

येत्या शनिवारी काँग्रेसचा भारत बचाओ – संविधान बचाओ फ्लॅग मार्च

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त संविधान व लोकशाही विरोधी केंद्रातील भाजप सरकारविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘भारत बचाओ – संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन केले आहे. उद्या शनिवार मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे. लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष संघटना व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
थोरात म्हणाले की, २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेद इ.भेदांवर मात करणारी अखिल भारतीय एकराष्ट्रीयता निर्माण करणे हे सूत्र ठरवण्यात आले.याच सूत्रावर काम करत काँग्रेसने स्वातंत्र्यचळवळ उभी केली, लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाचे संविधान तयार झाले. या संविधानानुसार आपला देश चालतो आहे. पण आज केंद्रातील भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी आणि संविधानविरोधी कार्यपद्धतीने देशात धार्मिक आणि सामाजिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची लोकशाही, संविधान, व्यक्तीस्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव यावर केंद्र सरकारने आघात केला आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजांनी या देशात फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवले होते तीच परिस्थिती भाजपचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा सरकार विरोधात स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे लढा उभारावा लागणार आहे.

केंद्र सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याचा निषेध करण्यासाठी व तरूण, विद्यार्थी व जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस स्थापना दिनी शनिवार २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथे ध्वजारोहण करून ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी असा भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे. राज्यभरातही विविध ठिकाणी फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहेत. हजारो काँग्रेस कार्यकर्ते या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या फ्लॅग मार्च मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

Previous articleमहात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता
Next articleशपथविधी सोहळ्यासाठी विधानभवनात तयारीला सुरूवात