खूशखबर : राज्य शासकीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ

खूशखबर : राज्य शासकीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला असून,मूळ वेतनावरील असणा-या महागाई भत्त्याचा दर १२ टक्क्यांवरून १७ टक्के करण्यात आला आहे.आज वाढविण्यात आलेला ५ टक्के महागाई भत्ता वाढ १ डिसेंबर 2019 पासून रोखीने देण्यात येणार आहे.

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पूर्णकालिन कर्मचा-यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा विचार राज्य सरकारचा होता.त्यानुसार राज्य शासकीय कर्माचा-यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे.यापूर्वी शासकीय कर्मचा-यांना १२ टक्के एवढा महागाई भत्ता देण्यात येत होता.आता त्यामध्ये ५ टक्क्यांनी वाढ केल्याने आता तो १७ टक्क्यांवर गेला आहे.त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.सदर महागाई भत्ता वाढ १ डिसेंबर २०१९ पासून रोखीने देण्यात येईल.तसेच १ जुलै २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या पाच महिन्याच्या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश जारी करण्यात येणार आहे.

Previous articleपाचव्या दिवशीही खातेवाटपाचा तिढा कायम
Next articleज्यांना जनतेने नाकारले त्यांच्यासोबत घरोबा करण्याचे पातक शिवसेनेने केले