१ लाख ४८ हजार ८२० लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ

मुंबई नगरी टीम
मुंबई : २६ जानेवारीपासून सुरु झालेल्या शिवभोजन थाळीचा राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० लोकांनी लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ म्हणाले, राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने शिवभोजन योजना सुरु केलेली आहे. शिवभोजन ही आमच्या शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून तिची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी सुरु आहे. आतापर्यंत राज्यात १२६ शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता भविष्यात याची व्याप्ती वाढविण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Previous articleस्त्रियांवरील अत्याचार प्रश्नी विशेष अधिवेशन बोलवण्याची सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Next articleकेंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा