केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई :  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांना केंद्रात महत्वाचे स्थान मिळणार असून, त्यांना  राज्यसभेवर पाठविण्यात येवून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश करण्यात येणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.गेली आठवडाभर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले देवेंद्र फडणवीस यांचे काल महाराष्ट्रात आगमन  झाले आहे.त्याच्या विषयी आलेल्या बातम्यासंदर्भात त्यांनी खुलासाही केला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेले काही दिवस दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांच्या दिल्लीतील मुक्कामावरून राज्यातील राजकारणात एकच चर्चा सुरू असताना आता फडणवीस यांना केंद्रात स्थान दिले जाणार असल्याच्या बातम्या काही चॅनलवर आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.दिल्लीताल प्रचार संपताच काल त्यांचे महाराष्ट्रात आगमन झाले.मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याच्या अफवा असून,मी कुठेही जाणार नाही,याबाबत मला कसलीही विचारणा करण्यात आली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याच्या बातम्या कोठून आल्या, कोणी पसरविल्या याबाबत मला काहीही माहिती नाही.त्यामुळे मी कुठेही जाणार नाही, राज्यातच राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.सध्या एखाद्याने अशा प्रकारची बातमी दिली की लगेच इतर माध्यमे बातम्या देतात हा अनुभव आहे. त्याचाच हा प्रकार असावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous article१ लाख ४८ हजार ८२० लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ
Next articleनांदेड मधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी ; भाजपचा धुव्वा