मुंबई नगरी टीम
मुंबई : मंत्री, राज्यमंत्री यांना वाटप करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना राज्यातील विविध गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध किल्ल्यांची नावे मंत्रालयासमोरील मंत्री आणि राज्यमंत्री यांना देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना देण्यात यावीत. असे विनंतीपत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. मंत्रालयासमोर असलेल्या अ-३ बंगल्याला सिंधुदुर्ग,अ-४ बंगल्याला राजगड,अ-५ बंगल्याला प्रतापगड ,अ-६ बंगल्याला रायगड, अ -९ बंगल्याला तोरणा, ब -१ बंगल्याला सिंहगड, ब -२ बंगल्याला रत्नदुर्ग,ब -३ बंगल्यालाजंजिरा, ब -बंगल्याला ४ पावनगड, ब -५ बंगल्याला विजयदुर्ग, ब – ६ बंगल्याला सिद्धगड, ब – ७ बंगल्याला पन्हाळगड,क -१ बंगल्याला आचलगड, क- २ बंगल्याला ब्रम्हगिरी, क -३ बंगल्याला पुरंदर, क-४ बंगल्याला शिवालय, क – ५ बंगल्याला अजिंक्यतारा, क-६ बंगल्याला प्रचितगड ,क – ७ बंगल्याला जयगड, क -८ बंगल्याला विशालगड अशी नावे देण्यात यावीत अशी विनंती करण्यात आली असल्याचेही सामंत यांनी सागितले.