मुंबई नगरी टीम
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा अद्यादेश काढून कायदा तयार करणार असल्याचे सांगतानाच,सरकार मुस्लिम आरक्षण लागू करण्याबाबत विचाराधिन असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
विधानपरिषदेत आमदार शरद रणपिसे यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. फडणवीस सरकारने मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी अद्यादेश काढला होता.त्याचप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा अद्यादेश काढून कायदा तयार करणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.