मुस्लिमांना आरक्षण दिल्यास मराठा,ओबीसी आरक्षणावर परिणाम

मुंबई नगरी टीम
मुंबई : मुस्लिम समुदायाला पुन्हा आरक्षण दिल्यास मराठा आणि ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल असा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.

राज्यातील मुस्लिम समुदायाला पुन्हा आरक्षण देण्याचा निर्णय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केला त्याबाबत ते म्हणाले,या आरक्षणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल.मुस्लिम समाजाला आरक्षण दिल्यास मराठा समाजाला दिलेले आरक्षण आणि सध्या ओबीसी समाजाला देण्यात येत असलेल्या आरक्षणात कपात करावी लागेल.तसेच मुस्लिम आरक्षण दिल्यास त्याची आकडेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त जाते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाला बाधा येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Previous articleमुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा कायदा करणार
Next articleसिंधुदुर्गमध्ये मुंबई विद्यापिठाचे उपकेंद्र सुरू करणार : उदय सामंत