कोरोना इफेक्ट : राज्यातील शाळा-महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद

मुंबई नगरी टीम
मुंबई :कोरोनाचा आजार टाळण्यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवड येथील शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा राज्य सरकारने कालच निर्णय घेतला होता. आता कोरोना विषाणूच्या होणाऱ्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना येत्या ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केले आहेत.शाळा महावविद्यालये बंद ठेवण्यात येणार असले तरी दहावी-बारावी आणि विद्यापीठांच्या परीक्षा मात्र सुरू ठेवाव्यात येणार आहे.त्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचनाही असेही शिक्षण विभागासोबत संबंधित विभागाला दिले आहेत.

राज्यात कोरोनाचे २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता काल शुक्रवारी मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे.खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई,नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे,नागपूर येथील व्यायामशाळा,चित्रपट आणि नाट्यगृहे,जलतरण तलाव या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दहावी व बारावीच्या परीक्षा वगळून शाळा, महाविद्यालये देखील बंद करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. आता सार्वजनिक आरोग्य विभागाने आदेश जारी केले असून,या आदेशानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका,नगरपालिका,नगरपंचायती क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालयात आणि त्यासोबतच आयटीआय आदी सर्व शैक्षणिक संस्था येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात याव्यात असे आदेशात म्हटले आहे.शाळा महावविद्यालये बंद ठेवण्यात येणार असले तरी दहावी-बारावी आणि विद्यापीठांच्या परीक्षा मात्र सुरू ठेवाव्यात येणार आहेत.

राज्यात दहावीसह बारावीच्या आणि महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत.या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या परीक्षा घेतल्या जाव्यात असे या आदेशात म्हटले आहे.मात्र या परीक्षा घेताना एखादा आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत, यासाठी आवश्यक ती दक्षता आणि खबरदारी घेण्याच्या सूचनाही संबंधित संस्था प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा,१८९७ याचा आधार घेतला आहे.त्या कायद्यातील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे.

Previous articleसीएएच्या विरोधातील मुंबई बागच्या आंदोलनामागचा बोलविता धनी कोण ?
Next articleमंत्री अस्लम शेख यांनी वाटले विधानभवनात हँड सँनिटायझर