मंत्री अस्लम शेख यांनी वाटले विधानभवनात हँड सँनिटायझर

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी विधानभवन परिसरामध्ये सुरक्षारक्षक, पत्रकार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य, विधानभवनचे कर्मचारी यांना हँड सँनिटायझरच्या बॉटल्स देऊन या मोहिमेची सुरुवात केली.मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी जवळपास दिड लाख हँड सँनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहेत.

कोरोना’रोगावर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मुंबईमध्ये शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, उच्च न्यायालये व इतर रहदारीच्या ठिकाणी हँड सँनिटायझरचे मोफत वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाच्यावतिने घेण्यात आलेला आहे. जिल्हा नियोजनमध्ये यासाठीची आर्थिक तरतुद करण्यात येईल. आज मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी विधानभवन परिसरामध्ये सुरक्षारक्षक, पत्रकार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य, विधानभवनचे कर्मचारी यांना हँड सँनिटायझरच्या बॉटल्स देऊन या मोहिमेची सुरुवात केली. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी जवळपास दिड लाख हँड सँनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहेत.
शेख म्हणाले की, हँड सँनिटायझर व मास्कचा काळा बाजार करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे. असा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोरात-कठोर कारवाई केली जाईल.

Previous articleकोरोना इफेक्ट : राज्यातील शाळा-महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद
Next articleकल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील १८ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद