मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत.मुंबई येथे ४ जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आता मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ११६ वरून १२२ एवढी झाली आहे.
राज्यातील कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.महाराष्ट्रात सकाळी करोनाग्रस्तांची संख्या १०७ वरुन ११६ वर होती आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. काल मंगळवार संध्याकाळ ते बुधवार दुपारी या कालावधीत नऊ नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११६ वर गेली होती आता दुपार नंतर त्यामध्ये वाढ झाली आहे. आता मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ११६ वरून १२२ एवढी झाली आहे. परवापर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ९७ होती. काल मंगळवारी ४ नवे रुग्ण आढळल्याने संख्या १०१ वर पोहचली होती. त्यानंतर त्यामध्ये वाढ होवून १०७ वर पोहचली. आज सकाळी नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली होती. परंतु दुपारी मुंबईत ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ११६ वरून १२२ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी असली तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.