मुंबई नगरी टीम
मुंबई : मार्च अखेरीस राज्यातील कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून,कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या कर्जांचे तीन हप्ते आणि कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करा असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी बँकाना दिला आहे.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार घेवून अडचणीत असलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तीन महिने कर्जाचे हप्ते स्थगित करा आणि कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे. आता पुढील निर्णय संबंधित बँका घेतील त्यामुळे सर्वसामान्यांना सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. निर्णयामुळे सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहेत. रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे.याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.