कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच : उदय सामंत

मुंबई नगरी टीम

मुंबई : दहावीचा भूगोल विषयाचा पेपर  आणि नववी, अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.मात्र या निर्णयामुळे महाविद्यालयीन परीक्षाही रद्द झाल्या अशा प्रकारचे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले आहे.परंतु असा कोणताही निर्णय घेतला नसून,कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा भूगोल विषयाचा पेपर आणि नववी ,अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला मात्र या निर्णयामुळे महाविद्यालयीन परीक्षाही रद्द झाल्या अशा प्रकारचे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत  यांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट करून कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार असल्याचे सांगितले आहे.महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला नाही असेही सामंत यांनी सांगितले,महाविद्यालयीन परीक्षासंदर्भात चार कुलगुरुंची समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीच्या ज्या शिफारशी येतील त्यानंतर यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे असेही सामंत यांनी स्पष्ट केले. त्यानुसार या परीक्षा केव्हा,कोणत्या वेळेत आणि कशा प्रकारे घ्यायच्या याचा निर्णय होईल. नंतर राज्यपाल  महोदयांकडे याबाबत जावे लागेल,त्यानंतरच उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाविद्यालयीन परीक्षांबाबत निर्णय घेणार आहे.

दरम्यान कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली,तर भविष्यातील परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल.या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या की घ्यायच्या नाहीत, याचा साचा अजून बनलेला नाही. मात्र सध्यातरी कुठल्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार आहेत, त्या कशा पद्धतीने घ्यायच्या यावर विचार सुरू असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी  सांगितले.

Previous articleप्रविण दरेकरांच्या पुढाकारने दलित वस्त्यांमध्ये ५ हजार अन्नधान्य किटचे वाटप
Next articleगृहनिर्माण मंत्र्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, म्हणाले ” मी पुन्हा येईन..!”