प्रविण दरेकरांच्या पुढाकारने दलित वस्त्यांमध्ये ५ हजार अन्नधान्य किटचे वाटप

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या संकटसमयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सामाजिक भान बाळगून दलित आणि आदीवासी वस्त्यांमधील बांधवांना अन्न धान्याचे किटचे वाटप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पुढाकराने करण्यात येणार आहे.बोरिवली दहिसर कांदिवली परिसरात सुमारे ५ हजार अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात येणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून आणि शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत वस्ती वस्तीतील कार्यकर्ते स्वतःची काळजी घेऊनच त्या वस्तीमधील आदिवासी, दलित व गरजूंना हे वितरण करण्यात येणार आहे,असे दरेकर यांनी सांगितले.अन्नधान्याच्या किटमध्ये तांदूळ,गव्हाचे पीठ, डाळ, तेल, साखर चहापूड, मसाला आदी पदार्थांचा समावेश आहे. आज सर्व साहित्य बोरीवली पूर्व फुलपाखरू उद्यानातील सभागृहात साठवण करण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी संबंधित कार्यकर्त्यांना सूचना दिल्या असून त्यांना कूपन देण्यात आली आहेत. उद्या दिवसभरात कूपनधारकांना अश्या प्रकारचे वितरण करण्यात येणार आहे.

भाजपचे सेवा भावी कार्यकर्ते या वितरण व्यवस्थेचे नियोजन करीत आहेत. केतकी पाडा, रावळपाडा,काजूपाडा,  दामूपाडा,नरसीपाडा,दामूनगर आदी झोपडपट्टी परिसरातील गरजूंना अन्नधान्याच्या किटचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच कोरोनोच्या संकटसमयी विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या पुढाकाराने सुरु असलेले भोजन व्यवस्था, भाजीपाला व अत्यावश्यक वस्तूंचे वितरण सलगपणे सुरू आहे. या सर्व वस्तूंचे वाटप शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचिवण्याची काळजी दरेकर स्वत जातीने घेताना दिसत आहे. मदतकार्य करताना अनेकांचे फोटो आपण पाहिले असतील, अनेक ठिकाणी मदतीच्या रांगा ही पाहिल्या असतील. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गोरगरीब जनतेला मदतीचा दरेकर पॅटर्न सध्या सगळीकडे कौतुकाचा विषय बनलाय. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक भान बाळगत अन्नधान्य तसंच गरजेच्या वस्तूंच्या पाच हजार किटसचे वाटप हाती घेतले आहे.

लॉकडाऊन झाल्यापासून प्रविण दरेकर यांनी कांदिवली-बोरीवली-दहिसर भागातील गरजू नागरिकांना जेवण तसंच अन्य मदतीचं वाटप सुरू केलं होतं. मास्क, सॅनिटायझर यांचं वाटपही त्यांनी केलं होतं. सफाई कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना मदतीचं वाटप असो नाहीतर गरजूंना मदत, प्रविण दरेकरांनी सर्व प्रकारची मदत लोकांना त्यांचा दारापर्यंत पोहोचवली. कठेही गर्दी नाही, रांगा नाही अशा पद्धतीने अतिशय सुनियोजत पद्धतीने प्रविण दरेकर यांनी मदतीचे वाटप केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आता दरेकर यांनी शिजवलेलं अन्न न वाटता आवश्यक तो शिधा घरपोच मिळेल अशी व्यवस्थाच त्यांनी उभी केली आहे.

Previous articlecorona : मुख्यमंत्री सहायता निधीत १९७ कोटी जमा
Next articleकोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच : उदय सामंत