मुंबई नगरी टीम
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील पत्रकार,छायाचित्रकार, कॅमेरामन यांची कोरोना चाचणी करण्यात आली.या चाचणीत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणा-या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जाहीर आभार मानले आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. असे असले तरी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे शहरातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन अशा ३८ जाणांची तातडीने कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचे आज रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह आले आहेत. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या कमिटीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व राज्याचे नगरविकास मंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी विशेष मेहनत घेतली.